स्कूटी किंवा बाइक खरेदी करताय तर ही ऑफर बघाच

सेल सेल सेल
फेसबुकवर जुन्या बाइकचा मोठा सेल
स्कूटी किंवा बाइक खरेदी करायची आहे परंतु, त्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर चिंता करण्याची गरज नाही. तुमची जर नव्या बाइक ऐवजी जुनी बाइक किंवा स्कूटी खरेदी करण्याची तयारी असेल, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक सोपी पद्धत सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही यूज्ड बाइक किंवा स्कूटर खूपच स्वस्तात खरेदी करू शकतात. यूज्ड टू – व्हीलरला सोप्या भाषेत सेकंड हँड दुचाकी वाहन म्हणून शकतो. खरं म्हणजे, ऑनलाइन किंवा ऑफलाइन असे दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत. या ठिकाणी जुन्या टू-व्हीलर्सला स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.
खूपच कमी लोकांना हे माहिती आहे की, ज्या फेसबुकचा आपण वापर करतो. फोटो, पोस्ट किंवा टेक्स्ट मेसेज शेअर करण्यासाठी. त्याचा वापर करून तुम्ही टू-व्हीलर्स बाजार सुद्धा पाहू शकता.
सर्वात आधी फेसबुक प्रोफाइलला ओपन करा. उजव्या बाजुला तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. येथे तिसऱ्या नंबरवर मार्केट ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक किंवा टॅप करा. या सेक्शन मध्ये तुम्हाला सर्व कॅटेगरीज दिसेल. यात Vehicles कॅटेगरीवर क्लिक करा. नंतर Price सेक्शनवर तुम्ही किंमतीची रेंज ठरवू शकता. या ठिकाणी Filter ऑप्शनमध्ये तुम्ही ठरवू शकता. वरच्या कॅटेगरीत कार किंवा मोटरसायकलचा ऑप्शन निवडू शकता. आता तुम्ही आपल्या पसंतीची आणि बजेट मधील वाहन निवडू शकता. याशिवाय, वाहन विकणाऱ्या व्यक्तींशी संपर्क करू शकता.
फेसबुक मार्केटमध्ये १५ हजार रुपये ते २५ हजार रुपयाची लिमिट सेट केली आहे. यानंतर जे ऑप्शन आम्हाला दिसले त्यात Honda Activa चे २०12 चे मॉडल १५ हजार रुपये किंमतीत मिळत आहे. बजाज पल्सर १५० चे २०१1 चे मॉडल २० हजार रुपये किंमतीत मिळत आहे. तर TVS Apache 160 चे २०१1 मॉडल २२ हजार रुपयात मिळत आहे. याशिवाय, हिरो स्प्लेंडर स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकते.