‘सख्खे शेजारी’ टाइटल सॉन्ग धम्माल विडियो

Sakkhe Shejari | Title Song Making | Colors Marathiशेजाऱ्यांसोबत खेळला जाणारा हा खेळ आहेच खास. मग कार्यक्रमाचं शीर्षकगीत असणारच ना एकदम झकास. हेच शीर्षकगीत रेकॉर्ड करताना आलेली धमाल मजा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी. पाहा #SakkheShejari सोम-शनि. संध्या. 6.30 वा. #ColorsMarathi वर. Avadhoot Gupte
Posted by Colors Marathi on Friday, 22 January 2021
एक हक्काचं घरं, आधाराचा हात आणि एक हाक देताच मदतीला धावून येणारा शेजारी लाभणं म्हणजे भाग्यच, असं म्हणतात. कोसो दूर असलेल्या नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा, अडीअडचणीच्या काळात आपल्याला पहिल्याप्रथम आठवतो तो शेजारीच. काही शेजा-यांशी आपले घरचे ऋणानुबंध जोडले जातात आणि म्हणूनच आपण त्यांना ‘सख्खे शेजारी’ म्हणतो. आपण आपल्या शेजार्याला किती ओळखतो, त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आणि याच शेजार्यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी कलर्स मराठी टेलिव्हिजनवर ‘सख्खे शेजारी’ हा धमाल शो सुरू होतोय. ११ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे.
अनेक वर्षे एकमेकांच्या सान्निध्यात राहिलेली, एकमेकांशी ऋणानुबंध असलेली, सांसारिक वाटचालीत साक्षीदार असलेली, आजूबाजूला किंवा एकाच सोसायटीत राहणारी दोन कुटुंबं या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये येणार्या दोन सख्ख्या शेजार्यांमधील नातं किती घट्ट आहे हे अनुभवण्यासाठी काही गमतीदार, धम्माल असे गेम, टास्क सादर होतील. कार्यक्रमामध्ये विजेत्या कुटुंबाला ५० गृहउपयोगी गोष्टी, डिझायनर नेमप्लेट याचसोबत सहभागी कुटुंबियांना गेममध्ये रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाविषयी बोलताना चिन्मय उदगीरकर म्हणाला, “बऱ्याच वर्षांपासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. ‘सख्खे शेजारी’ सारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली मी खूप आनंदी आहे. मी आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलो. कलर्स मराठीसोबत माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे आणि मी पुन्हा एकदा या कुटुंबाशी जोडलो जातो आहे याचा मला खूप आनंद आहे.”