का होणार इंस्टाग्राम, फेसबुक बंद? सविस्तर माहिती

तर इंस्टाग्राम, फेसबुक होणार बंद ?
केंद्राच्या डेडलाईनला पाठ दाखवल्याने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या कंपन्या भारतात काम करणे बंद करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत.
या पाश्र्वभूमीवर हे प्रकरण सविस्तर समजून घेऊयात..
केंद्राने जाहीर केलेले नियम असे :-
● सोशल मिडियावरच्या माहिती तिनस्तरीय तपासणी करावी
● सोशल साईटवरून वाईट, नियमबाह्य कन्टेन्ट हटवणे
● पोर्नोग्राफी, अश्लीलतेला आळा घालावा.
● तक्रारींबाबत 24 तासांत कारवाई होणे अपेक्षित.
● युझर्सच्या तक्रारीसाठी कंन्यांनी स्वत्रांत यंत्रणा स्थापन करावी.
● महिलांविरोधी पोस्ट 24 तासात हटवाव्या लागतील.
● या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वत्रांत अधिकारी नेमावा
हे ही वाचा – Bella Ciao गाण्याचं कडक मराठी व्हर्जन एकदा ऐकाच
ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीचे नियम :
● पॅरेंटल लॉकची यंत्रणा तयार करावी
● डिजिटल मीडिया पोर्टल्सनीही नियमांचे पालन करावे.
● ओटीटी प्लॅटफॉर्मना आता सर्व माहिती सरकारला द्यावी लागेल.
● सेल्फ क्लासिफिकेशन करण्यात यावेत
तर कारवाईची शक्यता
● दिलेली मुदत संपत आली असून नियम न पाळणाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
● परंतु या चर्चांना आतापर्यंत कोणाकडूनही अधिकृतपणे दुजोरा मिळाला नाही.
● कंपन्यांना या नियमांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने 3 महिन्यांची मुदत दिली होती.