राज्यातील निर्बंध अधिक कडक, बघा काय आहेत नवीन निर्बंध

राज्यातला लॉकडाऊन आता अधिकच कडक होणार आहे, लॉकडाऊन असून सुद्धा गर्दी कमी होत नसल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे,
किराणा, भाजीपाला, लोकल यावर देखील कडक निर्बंध येणार आहेत पेट्रोल पंपावर देखील कडक निर्बंध घातले जाणार आहेत फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना आज पेट्रोल मिळणार आहे.
लॉकडाऊनचा पहिला दिवस होता तरी देखील आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी पाहायला मिळाली, लोकलला सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
मंत्री विजय वडेट्टीवार, यांनी ही माहिती दिली आहे, राज्यातला लॉकडाऊन अजून कडक होणार आहे, आजही गर्दी कमी होत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे किराणा आणि भाजी खरेदी साठी मोठ्या प्रमाणात नागरिक घरा बाहेर पडत आहे.त्यामुळे लॉक्डाऊन असल्यासारखा वाटतच नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहे.
काही कडक निर्बंध घातले जातील, लोकल प्रवासात देखील काही निर्बंध घातले जाणारे तर सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही तर अत्यावश्यक सेवेत असलेल्या लोकांना मिळू शकणार आहे.