मुंबई पोलिसांनी ट्विट करून सांगितला निर्णय

वाढत्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सरकारने सर्वांना कलर code चे नियम दिले होते जेणे करून लाल रंग म्हणजे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी, हिरवा रंग म्हणजे भाजीपाला आणि किराणा सामानाची ने आण करणाऱ्या वाहतुकीसाठी आणि पिवळा रंग हा इतर वाहतुकीसाठी केला होता पण तरी सुद्धा इतर आणि गावी जाणारी मंडळी उगाच गर्दी करून सर्व नियम मोडत असल्यामुळे काल मुंबई पोलिसांनी ट्विट करून सांगीतल की लाल पिवळा हिरवा रंग वर्गीकरण बंद केले जात आहे. आम्ही अशा करतो की तुम्ही आम्हाला support कराल आणि विना आपत्कालीन आणि आवश्यक शिवाय घरा बाहेर पडणार नाही 🙏
प्रिय मुंबईकरांनो.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 23, 2021
लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.#StayHomeStaySafe
कृपया करून विना अत्यावश्यक घरा बाहेर पडू नका. जेणे करून हा संसर्ग पासरण्यापासून आपण रोखू शकतो. मुंबई पोलिसांना पाठिंबा द्या.
