Marathi Serial
घरोघरी मातीच्या चुली 18 फेब्रुवारी प्रोमो

घरोघरी मातीच्या चुली, या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत, महा अंतिम सोहळा सुरू होतो, त्यात ऐश्वर्या आणि सारंग, तर जानकी हृषिकेश दोघेच अंतिम स्पर्धक उरलेले असतात, तर त्यासाठी, आपापल्या नवऱ्याला मागे टायर वर बसवून बायकोने ओढत नेऊन स्पर्धा पूर्ण करायची असते.जानकी हृषिकेश आणि सारंग ऐश्वर्या स्पर्धेला सुरुवात करतात, पण यात शक्तीची सगळ्यात जास्त गरज असते,ऐश्वर्या कसलाही विचार न करता, जोर लावुन ओढत स्पर्धा पूर्ण करते, आणि वेड्या सारखी मोठमोठ्याने टाळ्या वाजवत म्हणते, जिंकली मी स्पर्धा….पण सगळेजण जानकी हृषिकेश साठी खुश होतात, कारण ऐश्वर्या स्पर्धा तर जिंकली असते, पण सारंग मात्र मागेच पडला असतो, त्यामुळे खरे विजेते ऋषिकेश जानकी झाले असतात.येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.